

Mahabaleshwar police during the late-night raid at Chamcham bungalow; six suspects booked in shocking case.
Sakal
भिलार: पाचगणीजवळील खिंगर (ता. महाबळेश्वर) येथील एका बंगल्यावर गायिका आणि महिला वेटरच्या नावाखाली बारबालांना आणून संगीताच्या तालावर अश्लील हावभाव करून नृत्य केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी ‘वर्षा व्हिला’ या बंगल्यावर छापा टाकून हॉटेल मालकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सुमारे १८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटनस्थळावर एकच खळबळ उडाली आहे.