

Heavy police presence in Savari village as Pune police team arrives for drug case investigation.
Sakal
कास: सावरी (ता. जावळी) येथे मुंबई क्राइम ब्रँचने छापा टाकून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह कच्च्या मालाचा ११५ कोटींचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आज पुन्हा पुणे पोलिस सावरीत दाखल झाले. त्यांनी जिथं ड्रग्ज बनवले जात होते, त्या जळक्या वाड्याची झाडाझडती घेऊन मुंबई क्राईम ब्रँचच्या छाप्यामधून शिल्लक राहिलेल्या काही वस्तू ताब्यात घेतल्या.