esakal | Ashadi Ekadashi : प्रतिपंढरपूर करहरात चोख पोलीस बंदोबस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Medha Police

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन व जमावबंदीचे आदेश असल्याने सामुदायिकरित्या आषाढी एकादशी साजरी करता येणार नाही.

Ashadi Ekadashi : प्रतिपंढरपूर करहरात चोख पोलीस बंदोबस्त

sakal_logo
By
महेश बारटक्के

कुडाळ (सातारा) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील प्रतिपंढरपूर करहर (Pratipandharpur Karhar) येथे पोलीस संचालन करण्यात आले. मेढा पोलिसांनी (Medha Police) आषाढीच्या (Ashadi Ekadashi 2021) निमित्ताने, तसेच लॉकडाउनच्या (Corona Lockdown) नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पाचगणी रोडपासून विठ्ठल मंदिर परिसर, बाजारपेठ, खर्शी बारामुरे रोड ते आंबेघर फाटा अशा मार्गे पोलीस संचलन केले. (Police Security At Karhar Due To Ashadi Ekadashi bam92)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन व जमावबंदीचे आदेश असल्याने सामुदायिकरित्या आषाढी एकादशी साजरी करता येणार नाही. तरी भाविकांनी आपापल्या घरातच राहून ती साजरी करावी. तसेच करहर येथील मंदिरात कोणीही प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये, केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम केला जाईल, जिल्हा प्रशासनाने बंद केलेल्या विठ्ठल मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून कुलूप बंद ठेवली आहेत.

हेही वाचा: ऐतिहासिक किल्ले धोक्यात; शिवरायांच्या विचारांना तिलांजली देण्याचा प्रयत्न!

तसेच मंदिरातील विठ्ठलाचे दर्शन हे ऑनलाइन पद्धतीने करण्याची प्रशासनाने सोय केलेली आहे, त्यानुसार प्रत्येकाने घरी राहून ऑनलाइन दर्शन घ्यावे, आषाढी या कार्यक्रमादरम्यान नागरिकांकडून नियम व अटींचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले. तसेच नियमांचे कोणाकडून उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी पोलीस उपअधीक्षक, वाई विभाग, डॉ. शीतल जानवे खराडे, मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल माने यांनी रुट मार्च करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व शांतता राहावी हा संदेश दिला आहे.

Police Security At Karhar Due To Ashadi Ekadashi bam92

loading image