

Dangerous Wrong-Side Driving Sparks Police Crackdown in Prime City Area
Sakal
सातारा : पोवई नाक्यावरून कामाठीपुरा, शाहूनगर भागात जाणारे नागरिक रजतसागर कॉम्प्लेक्समोरुन नो एन्ट्रीतून वाहने चालवत नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करत होते. या प्रकारामुळे दोन्ही बाजूची वाहने एकत्र येत असल्याने हा मार्ग धोकादायक बनत चालला आहे. यावर आज वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड लावून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत, तसेच कठोर कारवाईचा फलक लावत वाहनचालकांना इशारा दिला आहे.