
कऱ्हाड : जमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरून वारुंजीत झालेल्या मारामारीत दोन पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी शासकीय गणवेशातील पोलिस कर्तव्य बजावीत असताना सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करून शिवीगाळ, धक्काबुक्की करून मारहाण केल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी किशोर तारळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.