

Congress Leader Manohar Shinde Likely to Join BJP Soon; Formalities Remain Pending
Sakal
कऱ्हाड: काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय व मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत श्री. शिंदे यांची सायंकाळी भेट झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा झाल्याने श्री. शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. काँग्रेस पक्षाचा राजीनाम्यानंतर श्री. शिंदे कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय जाहीर करणार असल्याचे समजते.