esakal | ..त्या उदयनराजेंवर मला काहीच बोलायचं नाही; खासदारांच्या टीकेला अजितदादांचं 'उत्तर' I Ajit Pawar
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

जे काही लोक माझ्‍याबाबत बोलतात, मला असल्‍या लोकांना उत्तर द्यायचे नाही.

..त्या उदयनराजेंवर मला काहीच बोलायचं नाही : अजित पवार

sakal_logo
By
राजेंद्र शिंदे

खटाव (सातारा) : जरंडेश्‍‍वर कारखान्याबाबत (Jarandeshwar Sugar Factory) मला काहीही बोलायचे नसल्‍याचे सांगत जे असेल ते नियमाप्रमाणे होईल. संपूर्ण राज्‍याला माहितेय मी नियमाप्रमाणे वागणारा माणूस आहे. जे काही लोक माझ्‍याबाबत बोलतात, मला असल्‍या लोकांनाही उत्तर द्यायचे नसल्‍याची प्रतिक्रिया उपमुख्‍यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खटाव येथील कार्यक्रमानंतर प्रसारमाध्‍यमांपुढे नोंदवली. याचदरम्‍यान त्‍यांनी सातारा जिल्‍हा बँकेबाबत (Satara District Bank Election) विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Speaker Ramraje Nimbalkar), पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील हे निर्णय घेतील, असे स्‍पष्‍ट केले.

श्री. पवार यांना जरंडेश्‍‍वर सहकारी साखर कारखान्‍याच्‍या अनुषंगाने माजी खासदार किरीट सोमय्‍या (Kirit Somaiya) यांनी केलेल्‍या आरोपांविषयी छेडले असता, त्‍यांनी वरील प्रतिक्रिया दिली. जिल्‍हा बँकेत महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवणार का, या प्रश्‍‍नावर श्री. पवार म्‍हणाले,‘‘ आम्‍ही राज्‍याचे बघत असतो. स्‍थानिक पातळीवरचा निर्णय स्‍थानिक पदाधिकारी घेत असतात. जिल्‍हा बँकेबाबत रामराजे व इतर सहकारी निर्णय घेतील.’’

हेही वाचा: अजित पवारांनी आमच्या आज्ञेचं पालन करावं : उदयनराजे

राज्‍यातील साखर कारखानदारी अडचणीत असल्‍याबाबत ते म्‍हणाले,‘‘ सहकार चळवळ स्‍व. यशवंतराव चव्‍हाण व इतर पदाधिकाऱ्यांनी स्‍थापन केली. त्‍यावेळी सहकार योग्‍य लोकांच्‍या हातात होता. नंतरच्‍या काळात त्‍यात इतर शिरले. व्‍यावसायिक दृ‍ष्‍टिकोन तसेच शिस्‍त न बाळगल्‍याने सहकार गोत्‍यात आला आहे. यापुढील काळात सभासदांनी चांगल्‍या लोकांच्‍या ताब्‍यात कारखाने द्यायला पाहिजेत. कारखानेच नाहीत तर इतर सहकारी संस्‍था देखील चांगल्‍या विचारांच्‍या व्‍यक्‍तींच्‍या ताब्‍यात देणे आवश्‍‍यक आहे.’’

हेही वाचा: राजकीय वातावरण तापलं! तिकीट मिळवण्यासाठी उमेदवार अजितदादांना भेटणार

विकासावर बोलू...

खासदार उदयनराजेंनी (MP Udayanraje Bhosale) केलेल्‍या टीकेबाबत विचारले असता, ते म्‍हणाले,‘ मला त्‍यावर काहीच बोलायचे नाही. विकासावर बोलू की, अशी प्रतिक्रियाही त्‍यांनी या वेळी नोंदवली.

loading image
go to top