

MP Udayanraje Bhosale
Sakal
सातारा: सर्व प्रभागांत भाजपच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला सुरुवात करावी. निवडणुकीत प्रचारासाठी ज्यांना आमची आवश्यकता असेल तेथे आम्ही उपलब्ध आहोत. मनोमिलन असल्याने मी काहींना न्याय देऊ शकलेलो नाही. त्यामुळे नाराज न होता सर्वांनी एकदिलाने काम करून मनोमिलनाच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.