

Ramraje Naik-Nimbalkar
Sakal
सातारा : मी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर कोणतेही आरोप केलेले नाहीत. जनाधार नसल्यामुळे त्यांनी कालचा तथाकथित इव्हेंट केला. नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी, मी प्रश्न काढून देतो. आमची नार्को चाचणी जवळ आली आहे, इलेक्शनमध्ये जनताच ठरवेल. खंडणी, प्रशासनावर दबाव टाकून कारस्थान रचत त्यांनी सर्वसामान्यांना हैरान करून सोडले आहे. याला मी शेवटपर्यंत विरोध करणार, अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.