

BJP wins both key posts in Javali local body politics
esakal
-महेश बारटक्के
कुडाळ: जावळी पंचायत समितीच्या निवडणुकीत 3-3 असे समसमान संख्याबळ असतानाही सभापतीपदी भाजपचे कुडाळ गणातून निव़डून आलेले सैारभ शिंदे तर उपसभापतीपदी भाजपचेच गोरख महाडिक यांची निवड झाली. निवडीच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय घडामोडी घडून सुध्दा शेवटच्या क्षणी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या चानाक्ष रणऩितीमुळे तालुक्याची महत्वाची दोन्हीही पदे भाजपच्याच पदरात पाडून जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजे 'धुरंधर' ठरले.