esakal | कऱ्हाडात घंटागाड्यावरुन राजकारण तापलं; कर्मचाऱ्यांत संताप
sakal

बोलून बातमी शोधा

Karad Municipality

कचऱ्याच्या निविदेच्या ठरावावर नगराध्यक्षा शिंदे स्वाक्षरी करत नसल्याने तो विषय चांगलाच गाजला.

कऱ्हाडात घंटागाड्यावरुन राजकारण तापलं; कर्मचाऱ्यांत संताप

sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (सातारा) : घनकचऱ्याच्या (Solid Waste Project) कार्यादेशावर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde) यांनी स्वाक्षरी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी आरोग्य विभागाच्या (Health Department Karad) कचरा संकलनासह (Garbage collection) घंटागाड्यांत एकसूत्रता आली नव्हती. नवीन ठेकेदाराने घंटागाडीवरील कंत्राटीने असलेल्या २२ कर्मचाऱ्यांना काल कामावरून कमी केले. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील, जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव (Janshakti leader Rajendra Yadav), लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील व भाजपचे गटनेते विनायक पावसकर यांच्या भेटी घेतल्या. कामावर घेण्याबाबत ठेकेदारास विनंती करण्याची गळ घातली. त्यामुळे शहरात बहुतांशी भागात आजही घंटागाड्या पोचल्या नाहीत. परिणामी, शहरात काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत होते. (Politics Started From Solid Waste Project In Karad Municipality)

कचऱ्याच्या निविदेच्या ठरावावर नगराध्यक्षा शिंदे स्वाक्षरी करत नसल्याने तो विषय रविवारी गाजला. त्या ठरावावर काल स्वाक्षऱ्या झाल्या. त्या वेळी तो प्रश्न मार्गी लागेल, असे वाटत होते. मात्र आज कर्मचाऱ्यांचा प्रश्न चिघळला. त्याचा परिणाम कचरा गोळा करण्यावर झाला. आजही शहरातील अनेक ठिकाणी घंटागाड्या पोचल्या नाहीत. परिणामी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास सुरवात केली. पालिकेत कर्मचाऱ्यांचा प्रश्नही चिघळल्याने आजअखेर कचऱ्याच्या निविदेत विस्कळितपणा कायम राहिला.

हेही वाचा: तीन आमदार, एक खासदार असूनही 'राष्ट्रवादी'ला मिळेना 'जिल्हाध्यक्ष'

नवीन ठेकेदाराने आरोग्याच्या २२ कर्मचाऱ्यांना थेट कामावरून डच्चू दिल्याने तो प्रश्न चिघळला. त्यावर सायंकाळी उशिरापर्यंत पालिकेत खलबते सुरू होती. घनकचऱ्याच्या नव्या ठेकेदाराने कंत्राटी पद्धतीने घंटागाड्यावर कामाला असलेल्या २२ जणांना कामावरून कमी केले. काहीही कारणे सांगून कामावरून कमी केले आहे, अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. नगराध्यक्षा शिंदे, उपाध्यक्ष पाटील, जनशक्तीचे गटनेते यादव व त्यांचे सहकारी, लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील व त्यांचे सहकारी आणि भाजपचे गटनेते विनायक पावसकर व त्यांच्या सहकऱ्यांशी कर्मचाऱ्यांनी चर्चा केली. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्याशी चर्चा सुरू होती.

Politics Started From Solid Waste Project In Karad Municipality

loading image