esakal | कास पठार परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग; जनजीवन गारठलं
sakal

बोलून बातमी शोधा

Kas Plateau

गेली पंधरा दिवसांपासून कास परिसरात ऊन-पावसाचा खेळ चालू होता.

कास पठार परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग; जनजीवन गारठलं

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

कास (सातारा) : गेल्या पंधरा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं (Heavy Rain Kas Plateau) आज रात्रीपासूनच रिपरिप चालू केल्याने कास, बामणोली व सह्याद्रीच्या माथ्यावरील जनजीवन गारठून गेलेय. सकाळी-सकाळी पावसानं धुवांधार बॅटिंग चालू केल्याने जुलै महिन्यातील अतिवृष्टीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

गेली पंधरा दिवसांपासून कास परिसरात ऊन-पावसाचा खेळ चालू होता. सकाळी पडणारे ऊन, तर दुपारनंतर पावसाची भूरभूर याने वातावरण आल्हाददायक होत होते. पण, अचानक जोरदार वारा व वाढलेला पावसाचा जोर यामुळे थंडीत प्रचंड वाढ झालीय. पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वताच्या रांगांनी व्यापलेला हा परिसर अतिवृष्टीचा म्हणून ओळखला जातो. डोंगर माथ्यावर जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ढग व धुक्यामुळे सूर्यदर्शन दुर्लभ होते.

हेही वाचा: बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या तालिबानीसमोर महिलेनं रोखली 'नजर'

आताही गेली आठ दिवसांचा वेळ सोडल्यास जूनपासून उन्हे पडलेली नाहीत. त्यामुळे सगळीकडे ओलंचिंब, कोंदट वातावरण तयार झालेय. त्यात माथ्यावर कायम धुक्याचे आच्छादन असल्याने याचा परिणाम माणसांबरोबर वनस्पती, पिके यावरही होवू लागलाय. या पावसानं आटलेले ओहोळ, ओढे, धबधबे पुन्हा प्रवाहित झाले असून नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. .

हेही वाचा: पुढील तीन दिवस राज्याला धोका; 'या' जिल्ह्यांत 'मुसळधार'

कासच्या फुलांचे गालिचे लांबणार

बहुचर्चित कास पठारावरील रंगीबेरंगी फुलांचा हंगाम चालू झाला असला, तरी अद्यापही पठारावर फुलांचे गालिचे तयार झाले नाहीत. ऊन-पावसाचा खेळ चालू असेल, तर फुले लवकर फुलतात; पण पावसानं पुन्हा जोर धरल्याने कासवरील फुलांचे गालिचे होण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.

loading image
go to top