esakal | सावधान! नेरळे पुलावरुन प्रवास करताय? मग, थोडं थांबा.. पूल बनलाय धोकादायक

बोलून बातमी शोधा

Nerale Bridge
सावधान! नेरळे पुलावरुन प्रवास करताय? मग, थोडं थांबा.. पूल बनलाय धोकादायक
sakal_logo
By
अरुण गुरव

मोरगिरी (सातारा) : मोरणा विभागाला जोडणाऱ्या व अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या नेरळे पुलाची दुरवस्था झाली असून, भागातील दळणवळण घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला असून, स्थानिक नेते मंडळींनी दुरुस्तीसह नव्या पुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने पुलाची अवस्था बिकट बनली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पुलाबाबत शासनाने ठोस भूमिका घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

नेरळे पूल अनेक वर्षांपासून जनतेची सेवा करत आला आहे. परंतु, पुलाचे आयुष्य आता संपण्याच्या मार्गावर असून, त्याची दुरवस्था झाली आहे. पुलाच्या लोखंडी सळ्या व पट्ट्या पवनऊर्जा प्रकल्पाच्या अवजड वाहनांमुळे उघड्या पडल्या आहेत. वाहनधारकांना वाहन चालवताना लोखंडाच्या पट्ट्यांचा त्रास होत असून, मुख्य अडथळा ठरत आहे. काही वेळा वाहनधारकाचे वाहन पंक्‍चरसुद्धा झाल्याच्या घटना घडल्या असल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. तसेच कोणत्याही क्षणी पुलाला भगदाड पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिक व वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला लागला आहे.

काळजी करु नका;गिर्याराेहक प्रियांकाने घेतला महत्वपुर्ण निर्णय

पावसाळ्यात कोयना धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे पूल कायम पाण्याखाली असतो. अतिवृष्टीमध्ये पुलाचे कायमचे मोठे नुकसान होत असते. यामध्ये पुलाच्या बाजूला असलेल्या संरक्षण कठड्याच्या लोखंडी पाइप तुटून जावून त्याची दुरवस्था होत असते. पुलाची खालची बाजूचा भराव पाण्यामुळे वाहून जावून पिलर खचण्याचाही धोका निर्माण झाला आहे. पावसाळा संपल्यानंतर बांधकाम विभागाच्या वतीने पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. तुटलेल्या लोखंडी पाइप जोडून किरकोळ डागडुजी करण्यात येते. पुलाबाबत ठोस निर्णय घेऊन नवीन पुलाचे बांधकाम करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

शेतकऱ्यांची देणी थकविल्याने किसन वीर, खंडाळा कारखान्याला जप्तीची नोटीस

नेतेमंडळी, मंत्री, माजी मंत्र्यांचे मौन

पुलाबाबत अनेक वेळा स्थानिकांनी आवाज उठवला आहे. येथे नव्याने पूल बांधावा, अशी येथील लोकांची अनेक वर्षांची मागणी आहे. परंतु, ती आजअखेर प्रलंबित असून, ती पूर्ण झालेली नाही. राजकीय नेतेमंडळी, मंत्री, माजी मंत्री यांनी याबाबत मौन पाळणे पसंत केल्याने पुलाची अवस्था बिकट बनली आहे.

Edited By : Balkrishna Madhale