

Karad city banner featuring Adv. Undalkar that fueled speculation of a Balasaheb Patil–Undalkar alliance in the upcoming municipal elections.
Sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड : सुमारे चार वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीने कऱ्हाड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली. त्यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांचे गट एकत्र आले होते, तर ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा गट पाटील यांच्यापासून दुरावला. मात्र, पालिका निवडणुकीसाठी पाटील-उंडाळकर गट एकत्र येताना दिसत आहे.