esakal | कऱ्हाड : पोस्ट कोविड तपासणी सेंटरची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हाड : पोस्ट कोविड तपासणी सेंटरची गरज

कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अद्याप तरी लस उपलब्ध नाही. मात्र, तरीही काही उपलब्ध औषधांवर रुग्ण बरे होत आहेत. मात्र, त्यांना देण्यात येणाऱ्या औषधांचा साईट इफेक्‍ट होत असल्याची सध्या चर्चा आहे. त्यामुळे अनेकांना वेगवेगळे त्रास सुरू झाल्याचेही बोलले जात आहे. डॉक्‍टरांसाठी हा अभ्यासाचा विषय बनला आहे.

कऱ्हाड : पोस्ट कोविड तपासणी सेंटरची गरज

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड ः कोरोना रोगावर अद्यापही लस उपलब्ध झालेली नाही, तरीही हॉस्पिटलमधून करण्यात येत असलेल्या उपचारावर रुग्ण बरे होत आहेत. मात्र, त्या उपचारासाठी देण्यात येत असलेल्या इंजेक्‍शन, औषधांमुळे बरे झालेल्या रुग्णांना इतर काही त्रास सुरू होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी पोस्ट कोविड तपासणी सुरू करण्याची करण्याची गरज आहे. त्याचा बऱ्याच रुग्णांना फायदा होण्यास मदत होईल.
 
कोरोनाचा संसर्ग मार्चपासून सुरू झाला आहे. या रोगामुळे महामारीचे संकटच सध्या आले आहे. त्यामुळे अनेकांच्या रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण झाला. या रोगावर लस शोधण्यासाठी जगातील संशोधकांमार्फत प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याला अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे हा संसर्ग होऊ नये, यासाठी हात स्वच्छ धुणे, सॅनिटाईज करणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे एवढेच सध्या पर्याय आहे. त्याची अंमलबजावणी केल्यास काही प्रमाणात हा संसर्ग रोखता येऊ शकतो. मात्र, जरी लस उपलब्ध नसली, तरी हॉस्पिटलमधून केल्या जाणाऱ्या औषधोपचारातून रुग्ण बरेही होत आहेत.
खेळ मनाचा... दुःखी की आनंदी जीवनाचा? 

हे कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांच्यावर केलेल्या औषधांचा साईड इफेक्‍ट जाणवत असल्याचे समोर आले आहे. काही रुग्णांना रक्तदाब, मधुमेहाचा त्रास सुरू झाला, काही रुग्णांना इतर शारीरिक त्रास सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या औषधोपचारानंतरच त्याचा त्रास वाढला. यासदर्भात सध्या डॉक्‍टरांकडून ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, या सुरू झालेल्या त्रासाची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने पोस्ट कोविड तपासणी केंद्र सुरू करण्याची गरज आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये तपासणी करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे त्याची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा उभारावी, अशी मागणी होत आहे.
तहसीलदार बाई मानेंचा धडाका; वाळूचोरांकडून साडेचार कोटींचा दंड वसूल 

डॉक्‍टरांसाठी अभ्यासाचा विषय 

कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अद्याप तरी लस उपलब्ध नाही. मात्र, तरीही काही उपलब्ध औषधांवर रुग्ण बरे होत आहेत. मात्र, त्यांना देण्यात येणाऱ्या औषधांचा साईट इफेक्‍ट होत असल्याची सध्या चर्चा आहे. त्यामुळे अनेकांना वेगवेगळे त्रास सुरू झाल्याचेही बोलले जात आहे. डॉक्‍टरांसाठी हा अभ्यासाचा विषय बनला आहे.

Edited By : Siddharth Latkar 

loading image