
ढेबेवाडी: विभागातील अनेक महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पावसामुळे पाणी साचून खड्ड्यांना लहान- मोठ्या डबक्यांचे स्वरूप आले आहे. एकीकडे खड्ड्यातून वाट काढताना कसरत सुरू असतानाच त्यातूनच वानरांचे कळप आणि मोकाट कुत्री रस्त्यावर येत असल्याने त्यांना चुकवायचे की खड्ड्यांना? असाही प्रश्न वाहनचालकांना पडत असून, त्यातून लहान-मोठे अपघातही होत आहेत.