Satara : उदयनराजेंशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण ते त्यांच्याच विश्वात असतात; शिवेंद्रराजेंनी उडवली खिल्ली

इगो वॉर खासदार उदयनराजे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी थांबवावा.
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosaleesakal
Summary

लोकनेते बाळासाहेब देसाई मोठे नेते होते. त्यांच्याविषयी आदर आहेच. त्यामुळे पालकमंत्र्यांनी शिवतीर्थ परिसराऐवजी इतर ठिकाणी त्यांचे स्मारक उभारावे.

सातारा : उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि शंभूराज देसाई यांच्यातील हे इगो वॉर असून, त्यात सातारकर आणि शिवप्रेमी अडकले आहेत. एकाने भिंतीवर चित्र रंगवले म्हणून दुसऱ्याने स्मारक उभारत आहेत. या पलीकडे यात दुसरे काही नसून हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी एका वृत्त वाहिनीवर नोंदवली.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘हा वाद दोन स्थानिक नेत्यांचा आहे. मध्यंतरी चित्र काढण्यावरून शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि उदयनराजे भोसले यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर चित्रकाराला पकडले. वाद झाला तरीही ते रेटून केलेच. माझं म्हणणं काय आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी कोणतीही तडजोड होणार नाही. करणार नाही.

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Satara : शिवस्मारकाला धक्का न लावता पोवई नाक्यावर बाळासाहेबांचं स्‍मारक होणारच; वादावर देसाईंची स्पष्ट भूमिका

हा इगो वॉर खासदार उदयनराजे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी थांबवावा. उलट माझं म्हणणे आहे, पालकमंत्र्यांनीच समंजसपणा दाखवावा. कारण दुसऱ्यांशी बोलण्यात काही अर्थ नाही. कारण ते त्यांच्याच विश्वात असतात. पालकमंत्र्यांनी लोकभावना विचारात घ्याव्यात.

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Siddheshwar Factory : कामगारांची पोटं भरणारी 'चिमणी' पुन्हा उभी राहणार; भारतीय महासंघ करणार मदत

लोकनेते बाळासाहेब देसाई मोठे नेते होते. त्यांच्याविषयी आदर आहेच. त्यामुळे पालकमंत्र्यांनी शिवतीर्थ परिसराऐवजी इतर ठिकाणी त्यांचे स्मारक उभारावे. आपण लोकप्रतिनिधी आहोत, लोकभावनांचा आदर करणे आपले काम असून, पालकमंत्र्यांनी याचा विचार करावा, करतील अशी माझी अपेक्षा असल्याचेही त्यांनी वृत्तवाहिनीस सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com