

“Sudden voltage surge in Kesarkar Peth leaves residents furious as costly electrical appliances burn out.”
Sakal
सातारा : शहरातील केसरकर पेठेत आता थोडा पाऊस झाला तरी लगेचच वीजपुरवठा खंडित होतोय. हा विजेचा येण्या-जाण्याचा खेळ सातत्याने सुरू असतो. विजेचा उच्च दाबाच्या झटक्यात अनेक घरांतील विद्युत उपकरणे जळाली. विजेच्या उच्च दाबामुळे झालेल्या नुकसानीचा निश्चित आकडा समजू शकला नाही. त्यामुळे विजेचा लपंडाव थांबवावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.