

Major Political Change in Panchgani Civic Body
sakal
-रविकांत बेलोशे
भिलार : पाचगणी नगरपालिकेच्या निवडणुकीत आज राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या सलग १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदाचा उमेदवार अटीतटीच्या लढतीत केवळ दोन मतांनी निवडून आणून सत्ता काबीज केली आहे. नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बगाडे यांनी लक्ष्मी कऱ्हाडकर गटाचे उमेदवार संतोष कांबळे यांना पराभूत करीत सत्ता काबीज केली. राष्ट्रवादीचा सत्तेचा विजनवास यानिमित्ताने दूर झाल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.