
सातारा : दिव्यांग व विधवांना सहा हजार रुपये मानधन मिळावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह इतर १७ मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेने आज दुपारी राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी येथे महामार्ग रोको आंदोलन केले. त्यामुळे कऱ्हाडहून पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली होती. सातारा शहर व तालुका पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर लाँग मार्च काढत आंदोलनकर्ते पोवई नाक्यावर आले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून येथे ठिय्या आंदोलन केले.