सणासुदीत फुलं-भाज्यांचे दर तेजीत

सणासुदीत फुलं-भाज्यांचे दर तेजीत
Updated on

सातारा :  लाॅकडाउनमुळे फुले व भाज्यांचे दर चांगलेच वाढले असून सामान्यांना ते खरेदी करणे न परवडणारे आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून शहरात म्हणावी तशी भाज्यांची आवाक होताना दिसत नसून नागरिकांना कडधान्यांवरतीच समाधान मानावे लागत आहे. सर्वत्र गणरायाचे आगमन झाले असून महालक्ष्मीचीही प्रतिष्ठापना झाली. त्यामुळे सर्वत्र फळ-भाज्यांसह फुलांची मागणी वाढली आहे. मात्र, या तुलनेत आवक कमी असल्याने फळभाज्या, फुले यांचे दर चांगलेच वाढले आहेत. सणासुदीच्या काळात दर आटोक्याबाहेर गेल्याने सर्वसामन्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाॅकडाउनमुळे कामं बंद असल्यामुळे सर्वसामान्यांना दररोजचा खर्च न परवडणारा आहे.

सातारा शहरात सध्या सणासुदीमळे बाजारात काही प्रमाणात रेलचेल आहे. घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. मंगळवारी महालक्ष्मींची स्थापना झाल्याने बाजारात खरेदीचा जोर आला होता. घरोघरी पूजेसाठी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, जिल्ह्यात फुलशेती कमी प्रमाणात होत असल्याने बाजारात इतर राज्यातून फुलांची आवक होत आहे. सजावटीच्या फुलांचे दर जास्त वाढले आहेत. बाजारात पुणे, कोल्हापूर व जिल्ह्याच्या आसपासच्या गावातून विविध फुले विक्रीसाठी येतात, तसेच परराज्यातूनही मोठ्या संख्येने फुले पाठवली जातात.

यामध्ये झेंडू, गुलाब, निशिगंधा, शेवंती आदींची नेहमी मागणी बाजारात असते. गणेशोत्सवामुळे सध्या फुलांची मागणी दुप्पट झाली आहे. सध्या शेवंतीचे दर ३०० ते ४०० रुपयांच्या घरात आहे, तर फुलांच्या हारांच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. सध्या सातारा बाजारपेठेमध्ये सफरचंद, संत्री-मोसंबी, केळी पेरु, चिकू इत्यादी फळांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. 

त्याशिवाय भाज्यांचेही दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. भाज्यांची चव वाढवणारा कोथिंबीरचा घाऊक दर थेट १३० रुपयांवर पोहचला असून किरकोळचा दर १५० रुपये किलो एवढा आहे. सध्या शेतात भाज्यांची लागवड  सुरू असल्याने केवळ २० टक्के भाजीपाला जिल्ह्यातून येत असून उर्वरित ८० टक्के बाजीपाला परराज्यातून येत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत. हिरवी मिरची घाऊकमध्ये ६० रुपये असून किरकोळ दर शंभर रुपये किलो आहे. इतरवेळी १० रुपये किलो मिळणारी वांगी सध्या ३० रुपये किलोवर पोहचली आहेत.

टोमॅटो ४०, कोबी २०, कारले २० तर शिमला मिरची ३० रुपये किलो तर शेपू भाजी ३० रुपये नगाप्रमाणे मिळत आहे. त्यामुळे सध्या सर्वच भाज्यांचे दर चांगलेच वाढल्याचे चित्र आहे. पुढील महिनाभर भाज्यांचे दर असेच तेजीत असतील असे विक्रेते सांगतात. सध्या शेतात पिकांची लागवड सुरू असल्याने केवळ २० टक्के भाजीपालाच जिल्ह्यातून येत असून बाकी इतर जिल्ह्यातून येत आहे. त्यामुळे सर्व भाज्या महागल्या आहेत. ऑक्टोबपर्यंत भाजीचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे. यंदा टाळेबंदीमुळे फुलशेतीलाही मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com