esakal | कऱ्हाड, वडगाव हवेली, उंडाळेत कोविड सेंटर करण्यावर शिक्कामोर्तब

बोलून बातमी शोधा

Prithivraj Chavan
कऱ्हाड, वडगाव हवेली, उंडाळेत कोविड सेंटर करण्यावर शिक्कामोर्तब
sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : शहरातील यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय हॉल, वडगाव हवेलीतील आरोग्य केंद्र आणि उंडाळे ग्रामीण रुग्णालयात नवीन 110 बेडची व्यवस्था केली आहे. तेथेच कोरोना रुग्णांवर उपचार करावेत. गरज पडल्यास आणखी बेड वाढवा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे दिली.

कोरोना रुग्णांसाठीच्या बेडच्या प्रश्नासंदर्भात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. रयत कारखान्याचे अध्यक्ष ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, नानासाहेब पाटील उपस्थित होते. आमदार चव्हाण यांनी कोरोनाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. बेडची उपलब्धता, रेमडेसिव्हिरचा पुरवठा, प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका, लसीकरण मोहीम आदी विषयांवर माहिती घेतली.

बेड पाहिजे, इंजेक्शन हवयं! भाजपच्या कार्यकर्त्यांना फाेन करा

श्री. चव्हाण म्हणाले, ""कऱ्हाड तालुक्‍यात सह्याद्री हॉस्पिटल, शारदा क्‍लिनिक, एरम हॉस्पिटल, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड हॉस्पिटल, राजश्री हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल, क्रांती सर्जिकल, कोयना हॉस्पिटल, सह्याद्री ऍग्री इंजिनिरिंग कॉलेज, देसाई हॉस्पिटल, निरामय हॉस्पिटल या 12 हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यात 866 बेडची तयारी केली आहे. त्यातील 183 बेड उपलब्ध आहेत.

मेरुलिंग घाटात 400 फुट दरीत गाडी काेसळली; दाेघे गंभीर जखमी

बेडच्या संख्येबाबत रोजची माहिती उपलब्ध करावी. तालुक्‍यातील, जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजनचा तुटवडा भासल्यास प्रशासनाने त्वरित पर्याय काढवा. हॉस्पिटलमध्ये ऑक्‍सिजन किती उपलब्ध आहे, त्याचीही माहिती द्यावी.''

कऱ्हाड तालुक्‍यात लसीकरण सगळीकडे व्यवस्थित सुरू आहे. लसपुरवठा मर्यादित होत असल्याने अडचण आहे. दिवसाला 15 हजार जणांना लस देऊ शकतो, अशी यंत्रणा केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण, आमदार, कऱ्हाड