esakal | बेड पाहिजे, इंजेक्शन हवयं! भाजपच्या कार्यकर्त्यांना फाेन करा

बोलून बातमी शोधा

BJP
बेड पाहिजे, इंजेक्शन हवयं! भाजपच्या कार्यकर्त्यांना फाेन करा
sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोना बाधितांच्या मदतीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. यामध्ये जिल्ह्यासाठी 15 कार्यकर्त्यांची टीम तयार केली असून, प्रत्येक शहरी आणि ग्रामीण भागासाठी प्रत्येकी दहा असे एकूण 175 जणांची टीम आहे. बाधितांच्या नातेवाइकांना या टीमचे बेड उपलब्धता, हॉस्पिटलची माहिती, इंजेक्‍शन, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची माहिती, रुग्णालयाकडून ज्यादा बिल आकारणीबाबतचे तक्रार निवारण, लसीकरणाबाबत माहिती आणि कोरोना कोविड सेंटरबाबत माहिती उपलब्ध केली जाणार आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, जिल्हा प्रभारी सदाशिव खाडे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीला प्रदेश कार्यकारिणी सदस्य मदन भोसले, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, सरचिटणीस आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

'सेवेच्या ठायी आम्ही तत्पर'; संकटकाळात एसटी चालक बनणार 'वायुदूत'

जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासाठी 15 कार्यकर्त्यांची टीम तयार केली आहे, तसेच प्रत्येक शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी प्रत्येकी दहा असे एकूण 175 जणांची टीम आहे. जिल्हा संघटन सरचिटणीस चंद्रशेखर वढणे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे फोन नंबर आणि नावे हेल्पलाइन म्हणून दिले आहेत.

काय सांगता! फोटोग्राफरच्या बंगल्यात राहतात Canon, Nikon, Epson; वाचा 'क्लिक'ची भन्नाट स्टोरी

सातारा- जावळी : विठ्ठल बलशेटवार 9822215269, विकास गोसावी 9011031794, डॉ. उत्कर्ष रेपाळ 8421791983, डॉ. वीरेंद्र घड्याळे 9422400024. कोरेगाव : राजेंद्र इंगळे 9822599139, गणेश पालखे 9822425782, आप्पा कदम 9172500555. वाई, महाबळेश्वर, खंडाळा : सचिन घाटगे 9822241548, अलंकार सुतार 8805775164. माण, खटाव, फलटण : सुहास मुळे 8275060182, जयकुमार शिंदे 9595365551. कराड, पाटण : महेंद्र डुबल 855199153, अजय पावसकर 8275387994, औषधांसाठी संपर्क : शैलेंद्र कांबळे 839010112. या पदाधिकाऱ्यांना संपर्क करून अडचणी सांगाव्यात, त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पावसकर यांनी सांगितले.

मेरुलिंग घाटात 400 फुट दरीत गाडी काेसळली; दाेघे गंभीर जखमी

सातारा जिल्हा परिषदेचा केंद्रात डंका; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'दीनदयाळ पुरस्कारा'ने सन्मान