केंद्रानं दुसरीकडं बोट दाखविण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत : पृथ्वीराज चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj Chavan

केंद्र सरकारनं किमान राज्याच्या कराएवढे दर कमी केले पाहिजेत.

'केंद्रानं दुसरीकडं बोट दाखविण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत'

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : केंद्र सरकारनं (Central Government) दुसरीकडं बोट दाखविण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलबाबत तुम्ही किती कर घेता व राज्य सरकार किती कर घेते याची तुलना करावी. त्यानंतर राज्य सरकार (Maharashtra Government) त्यांच्या पातळीवर दर कमी करेल, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केली. कॉंग्रेसच्या महागाई विरोधातील रॅलीनंतर आमदार चव्हाण यांनी पत्रकरांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केलीय.

आमदार चव्हाण म्हणाले, पेट्रोल-डिझेल तयार करण्यासाठी प्रति लिटरला 26 रूपये खर्च येतो. त्यावर दोघांनी कर लावले आहेत. त्यावर आपण चर्चा करायला हवीय. केंद्राचे कर किती, राज्याचे कर किती, केंद्रानं एक्साईचा कर किती लावला. कस्टमचा कर किती, सीएसटी, आयएसजीएसटी कर किती आहेत. राज्य सरकार किती घेते याची तुलना झाली पाहिजे. त्यानुसार दोघांनी कर कमी करावेत. दोघांनीही समान कर घ्यावेत.

हेही वाचा: 'केंद्रातील मोदी सरकारला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'

केंद्र सरकारनं किमान राज्याच्या कराएवढे दर कमी केले पाहिजेत. दोघांनी चर्चा करून ते दर आणखी कमी करावेत, याला आमची हरकत नाही. मात्र, आता आमची किमान दर कमी करण्याची रास्त मागणी आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं दुसऱ्याकडं बोट दाखविण्यापेक्षा तुलना करून डिझेल-पेट्रोलचे दर कमी करावेत. त्याशिवाय पर्याय नाही. राज्य सरकारनं काही वाटा घेण्याचं कारण नाही. पहिल्यांदा कर कमी झाले पाहिजेत, असंही त्यांनी सांगितलं. त्याशिवाय कमी करता येणार नाही.

हेही वाचा: काहीही बरळणाऱ्यांना राजाश्रय आणि पुरस्कार मिळतो : पृथ्वीराज चव्हाण

loading image
go to top