

कऱ्हाड : पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने कोणासोबत आघाडी करायची, की स्वबळावर लढायचे? या निर्णयासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कऱ्हाडमध्ये दाखल झाले. दुपारपासून त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी व्यक्तिगत संवाद साधण्यावर भर दिला. प्रत्येक पदाधिकारी, इच्छुकांशी त्यांनी जागा वाटपाचे काय, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे काय? यावर चर्चा केली. त्यात बहुतांशी पदाधिकारी, इच्छुकांनी सर्वसमावेशक आघाडी करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली. त्या अनुषंगाने रात्री उशिरा हालचाली होऊन उद्या (सोमवार) त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.