जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

नरेंद्र मोदींनी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मिळतील अशा घोषणा केल्या पण दहा वर्षात कोणतीच नोकरभरती झाली नाही उलट तरुणांना जुगाराच्या वाईट सवयी लावण्यासाठीच बेधडक जुगाराच्या जाहिराती सुरु आहेत.
Prithviraj Chavan and modi
Prithviraj Chavan and modiSAkal

कऱ्हाड : नरेंद्र मोदींनी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मिळतील अशा घोषणा केल्या पण दहा वर्षात कोणतीच नोकरभरती झाली नाही उलट तरुणांना जुगाराच्या वाईट सवयी लावण्यासाठीच बेधडक जुगाराच्या जाहिराती सुरु आहेत.

काँग्रेस असताना कधीही जुगार, दारू आदींच्या जाहिराती होत नव्हत्या पण आता जुगाराच्या जाहिराती माध्यमावर चालू आहेत कारण जुगार कंपन्यांकडून भाजपा ला इलेक्ट्रॉल बॉण्ड च्या माध्यमातून १४०० कोटींची देणगी दिली गेली.

चंदा दो धंदा लो असा उद्योग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आणि यामुळेच मोदींनी जुगार उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे काम केले असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजीत कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, काँग्रेसचे कऱ्हाड उत्तर अध्यक्ष निवासराव थोरात आदी उपस्थित होते.

काँग्रेस जाहीरनाम्याबाबत कायमच प्रयत्नशील राहिली आहे व त्यानुसार कायम अंमलबजावणी सुध्दा केली आहे असे सांगुण आमदार चव्हाण म्हणाले, काँग्रेसने ७० वर्षात काय विकास केला हे सांगण्याची गरज नाही तर देशातील जनताच उदाहरणाने तुम्हाला सांगत आहे.

पण मोदींना त्यांनी १० वर्षात काय विकास केला हे सांगता येत नसल्यानेच धार्मिक तेढ निर्माण करण्याची भाषा, काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत दिशाभूलीची वक्तव्य मोदी करत आहेत. अनेक उद्योगपतींचे उद्योग काढून फक्त अदानीला दिले जात आहेत म्हणून बाहेरील देशातील उद्योग भारतात येत नाहीत.

आपला देश हुकूमशाहीकडे निघाला आहे. १५ लाख खात्यावर येतील हा जुमला होता हे अमित शहांनी मान्य केले. १०० दिवसात परदेशातील काळा पैसा परत येईल अशी घोषणा केली होती का नव्हती? काळा पैसा तर आणला नाहीच पण काळ्या पैसावाल्यांना त्यांनी पाठीशी घातले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले पण त्यांच्या उत्पन्नावर टॅक्स लावला ही वस्तुस्थिती आहे.

महागाई कमी करणार म्हणून घोषणा केल्या पण महागाई दुप्पट झाली. रुपयाचे मूल्यांकन वाढविणार म्हणाले पण ते आणखी कमी केले. पेट्रोल डिझेल दरावरून दिशाभूल केली आज कच्चे तेलाचे दर कमी असून सुद्धा पेट्रोल डिझेलचे दर 100 च्या पारच आहेत. अशा अनेक घोषणा मोदींनी पूर्ण केल्या नाहीत.

कऱ्हाड उत्तरमधील कॉंग्रेस जीवंत

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कराड उत्तर विभागाचा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला इतका मोठा प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते असे सांगुण आमदार चव्हाण म्हणाले, कऱ्हाड उत्तर मधील काँग्रेस अजून जिवंत आहे व ती पुन्हा कार्यान्वित करण्याचे काम अध्यक्ष निवास थोरात यांनी केले. त्याचे समाधान वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com