esakal | माजी मुख्यमंत्र्यांच्या निधीने वांग नदीवरील पूल 'मजबूत'
sakal

बोलून बातमी शोधा

Yenke-Potle Bridge

माजी मुख्यमंत्र्यांच्या निधीने वांग नदीवरील पूल 'मजबूत'

sakal_logo
By
विलास खबाले

विंग (सातारा) : येणके-पोतले या दोन गावांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी वांग नदीवरील पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. एका गाळ्यावरील स्लॅबचे काम पूर्णत्वानंतर पावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी तो खुला होईल असे चित्र आहे. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न मिटणार आहे. त्याबद्दल प्रवाशांसह नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

येणके-पोतले दरम्यानच्या वांग नदीवरील यापूर्वीच्या पुलाची मोठी दुरवस्था झाली होती. कमी उंची आणि धोकादायक स्थितीमुळे सतत अपघात होत होते. पावसाळ्यात तर तो पूल पाण्याखाली जात असल्याने गैरसोय निर्माण होत होती. नवीन पुलाची मागणी ग्रामस्थांनी केली होती. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून त्यास मंजुरी मिळाली. त्यानुसार नाबार्ड अंतर्गत आठ कोटी चार लाख खर्च करून त्याचे काम होत आहे.

हे पण वाचा- बाजारपेठेसह मंडई, किराणा दुकानांत Social Distance चा फज्जा

हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पावसाळ्यात पुराचा धोका लक्षात घेऊन दहा मीटर उंच पूल केला आहे. पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण होईल असे चित्र आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी आकाश हुद्दार, श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुलाचे काम सुरू आहे. कऱ्हाड-पाटण दोन्ही तालुक्‍यांतील प्रवाशांसाठी हा मार्ग उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Edited By : Balkrishna Madhale