Prithviraj Chavansakal
सातारा
Prithviraj Chavan: विधानसभेबाबत निवडणूक आयोगाची प्रक्रिया संशयास्पद : पृथ्वीराज चव्हाण; सरकारबाबत नेमकं काय म्हणाले?
Satara News : बोगस मतदार वाढीची प्रक्रिया राज्यभर आयोगाने राबविली. मतदानाच्या आकडेवारीतही वाढलेल्या टक्केवारीबाबत कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाकडून दिले जात नाही. त्यामुळे महाराष्ट्र निवडणुकीत बोगस मतदान व वाढलेल्या टक्केवारीबाबत निवडणूक आयोगाची प्रक्रिया संशयास्पद आहे.
कऱ्हाड : राज्याच्या विधानसभेचा लागलेला निकाल अनपेक्षित होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या कालावधीत नवीन मतदार संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्या प्रक्रियेत दुबार, तिबार मतदारांची यादीत नावे असताना निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. बोगस मतदार वाढीची प्रक्रिया राज्यभर आयोगाने राबविली. मतदानाच्या आकडेवारीतही वाढलेल्या टक्केवारीबाबत कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाकडून दिले जात नाही. त्यामुळे महाराष्ट्र निवडणुकीत बोगस मतदान व वाढलेल्या टक्केवारीबाबत निवडणूक आयोगाची प्रक्रिया संशयास्पद आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.