
कऱ्हाड: आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा हक्क, अधिकार आहे; पण मुद्दा नेमका काय आहे? हे समजून घ्यायला हवे. एनआयए राष्ट्रीय यंत्रणा आहे. २०१४ पासून अमित शहा यांच्या निदर्शनात तपास सुरू होता. ठोस पुरावा असेल तर शिक्षा देता येते, अपुरा पुरावा सादर केल्याने शिक्षा देता आली नाही. अर्धवट माहिती घेऊ नका, मी काय म्हटले ते व्यवस्थित ऐकून व्यक्त झाले पाहिजे. दहशतवादाला जात, धर्म, रंग नसतो असे मी बोललो होतो; पण सोयीने अर्थ काढून मूळ मुद्दा बाजूला करण्यासाठी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण केले गेले; पण बॉम्बस्फोट कुणी केला हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. ते तपासाचे काम सरकारचे आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.