

Prithviraj Chavan addressing Congress workers while issuing a clear warning to the Maha Vikas Aghadi.
Sakal
सातारा : देशाच्या जडणघडणीत पक्षाचे मोठे योगदान असून, जिल्ह्यातील नवीन पिढीला सोबत घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीसाठी कामाला सुरुवात करावी. जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व दाखवून देण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी महाविकास आघाडीकडून सन्मान जनक तोडगा निघाला नाही, तर काँग्रेस स्वबळावर लढेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.