चंदगडमध्ये शिकारीने दिले पट्टेरी वाघाच्या वास्तव्याचे पुरावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघ

चंदगडमध्ये शिकारीने दिले पट्टेरी वाघाच्या वास्तव्याचे पुरावे

sakal_logo
By
(शब्दांकन - सचिन शिंदे)

सातारा (कऱ्हाड) ः कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड संवर्धन राखीव वनक्षेत्रात वाघाचा अधिवास आढळला आहे. वनक्षेत्रात वाघाने शिकार केल्यामे त्याच्या वास्त्यव्याचे पुरावे हाती आले आहेत. त्यामुळे सह्याद्रीच्या दक्षिणेकडील वन क्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ दक्षिणेकडील कर्नाटक मधील अन्शी दांडेली, भीमगड, महाराष्ट्रात तिलारी, दोडामार्ग, आजरा, भुदारगड, चंदगड , विशाळगड मार्गे उतरेत चांदोली व कोयनेपर्यंत भ्रमण करतो राज्य सरकाराने ५ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रात आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्ह आणि २२ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रात चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्हची घोषणा केली. त्यापूर्वी २९.५३ चौरस किलोमीटरच्या तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्व्हची स्थापना झाल्याने तेथील वन्यजीवांचा भ्रमणमार्ग जोडण्यासाठी मदत झाल्याचे स्पष्ट आहे. या तिन्ही संवर्धन राखीव वनक्षेत्रांंत वाघांचा अधिवास आहे. आंबोलीत यापूर्वी वाघांच्या पावलांचे ठशांसहीत त्याने केलेल्या शिकारीचे अवेशष मिळाले आहेत. लाॅकडाऊनच्या काळात आंबोली परिसरात वाघाचे छायाचित्र वन विभागाच्या कॅमेरा कैद झाले होते. तिलारी आणि आंबोलीच्या वनक्षेत्रांनी जोडलेल्या चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये वाघाचा वावर निदर्शनास सध्या समोर आले आहे.

हेही वाचा: Vidhan Parishad Election : 415 मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द

रेड्याची शिकारीवरून वाघाच्या अस्तीत्वाच्या खुना वन विभागातील अधिकाऱ्यांनी मिऴाल्या आहेत. वाघाने रेड्याला झुडपांत जवळपास १०० फुट फरफटत नेवून तेथे खाल्याची छायाचित्रेही आहेत. शिवाय तिथे वाघाची पदचिन्हे दिसली आहेत. त्यामुळे वाघाच्या अधिवासावर शिक्का मोर्तब झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या बाबत चंदगडचे परिक्षेत्र वनाधिकारी नंदकुमार भोसले म्हणाले, ? काॅन्झर्वेशन रिझर्व्हच्या निर्मितीमुळे वाघांचा भ्रमणमार्ग जोडला जाऊन तो संरक्षित झाल्याचा हा परिणाम आहे. मानद वन्य जीव रक्षक रोहन भाटे म्हणाले, चंदगडसहीत या भागातील वस्तूस्थिती लक्षात घेवून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची म्हणजेच स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स मंजूरी प्रलंबित आहे. ती मागणी पूर्ण व्हावी. तसे झाल्यास व्याघ्र प्रकल्पा व्याघ्र संरक्षण दल तैनात करता येईल.

"वाघ आणि इतर मोठ्या सस्तन प्राण्यांसाठी कॉरीडोर कनेक्टिव्हिटी (भ्रमणमार्गाची जोडणी) अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दक्षिणेकडील कर्नाटक मधील दांडेली, भीमगड, महाराष्ट्रात तिलारी, दोडामार्ग, आजरासह उतरेत चांदोली, कोयना ते जोर जांभळी पर्यंत भ्रमण करीत असतो हे अभासावरून दिसत आहे व हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अतिशय सकारात्मक आहे."

:- गिरीश पंजाबी व्याघ्र संशोधक, वाईल्डलाईफ कोन्झेर्वेषण ट्रस्ट

"तिलारी संवर्धन राखीव, चंदगड संवर्धन राखीव, दोडामार्ग आंबोली संवर्धन राखीव, छत्रपती शाहू महाराज आजरा-बुदरगड संवर्धन राखीव, गगनबावडा संवर्धन राखीव, पन्हाळगड संवर्धन राखीव विशाळगड संवर्धन राखीव तर एकीकडे राधानगरी वन्यजीव अभयारण्याला लागून आहेत तर दुसरीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्य व पुढे जोर जांभळी संवर्धन राखीव पर्यंत सलग लागून आहेत. भ्रमणमार्ग अखंड ठेवल्याने प्रजनन क्षेत्रातील वाघ व इतर तरून भक्षी प्राणी हे त्या क्षेत्राला जोडणाऱ्या इतर जंगलात आणि संरक्षित वन क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र अधिवास निर्माण करु शकतात हे अधोरेखित होते."

:- डॉ. व्ही. क्लेमेंट बेन मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर

loading image
go to top