
सातारा : साताऱ्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या नियोजित आयटी पार्कचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये लिंबमधील ४२ एकर व गोडोलीतील १६ एकर जागा हस्तांतरित करून ती एमआयडीसीकडे वर्ग करण्यासाठी यामध्ये मागणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आयटी पार्कसाठी खासदार उदयनराजे भोसले व बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्ही नेते आग्रही आहेत. त्यामुळे शासनदरबारी जागा हस्तांतराची प्रक्रिया तातडीने होण्याची शक्यता आहे.