Dhangar Reservation : महाबळेश्‍वरमध्ये धनगर समाजाचा मोर्चा; एसटीतून आरक्षण देण्याची मागणी, तहसीलदार पाटील यांना निवेदन

धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा व समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यभरात धनगर आंदोलन सुरू
protest for dhangar reservation of dhangar community at mahabaleshwar st category satara
protest for dhangar reservation of dhangar community at mahabaleshwar st category sataraSakal

महाबळेश्वर : धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा व समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाचे आंदोलन सुरू असून, महाबळेश्वर तहसील कार्यालयापर्यंत सकल धनगर समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये पिवळ्या टोप्या व पिवळे झेंडे हातामध्ये घेऊन धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरले होते.

या मोर्चाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामधून झाली. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोचला. तेथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, माजी नगराध्यक्ष बबनराव ढेबे यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची सरकारने अंमलबजावणी करावी, याकरिता शासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगितले.

protest for dhangar reservation of dhangar community at mahabaleshwar st category satara
Satara : मराठा विद्यार्थ्यांच्या खात्यावर साडेपाच कोटी ; ‘सारथी’ची कार्यवाही

इंदापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केलेल्या चप्पलफेकीचा निषेध केला. सकल धनगर समाजाच्या वतीने काढलेला हा मोर्चा मुख्य बाजारपेठमार्गे तहसील कार्यालयापर्यंत पोचला. तेथे या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले.

या वेळी रोहित ढेबे, प्रवीण काकडे आदींनी मनोगते व्यक्त करताना धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा व समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना निवेदन देण्यात आले.

या मोर्चात माजी नगराध्यक्ष बबनराव ढेबे, प्रवीण काकडे, प्रशांत आखाडे, रोहित ढेबे, रमाकांत आखाडे, रमेश चोरमले, अभय डोईफोडे, अशोक ढेबे, शंकर ढेबे, सुनील ढेबे, सचिन ढेबे, संतोष आखाडे, अजय आखाडे, संदीप आखाडे, प्रशांत कात्रट, राजू हिरवे, अनिल ढेबे, तुकाराम शिंदे यांच्यासह तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com