
सातारा : कोणतेही शिखर सर करणे आव्हानात्मकच. या आव्हानांना तोंड देत, एव्हरेस्ट बेस कॅम्प, किलोमंजारो अशी शिखरे सर करणे म्हणजे अभिमानास्पदच. त्यावेळी घेतलेल्या अनुभवाच्या जोरावर तिला युरोप खंडातील रशियाचे माउंट एलब्रुस शिखरही खुणावू लागले आणि ते आव्हान स्वीकारत तिने वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी उणे १४ अंश सेल्सिअस तापमानात तब्बल पाच हजार ६४२ मीटर उंचीचे हे शिखरही ‘धैर्या’ पुढे ठेंगणे असल्याचे दाखवून दिले. त्या धैर्यवान कन्येचे नाव म्हणजे धैर्या कुलकर्णीच..!