

Honour for Jawali Prithviraj’s Remarkable Entry into the Indian Air Force
Sakal
-प्रशांत गुजर
आनेवाडी : जावळी तालुक्यातील सायगावच्या भूमीतून घडलेला पृथ्वीराज हिंदूराव (किरण) कदम या तरुणाने भारतीय वायुसेनेत भरारी घेत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (AFCAT) या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षेत त्याने ऑल इंडिया ५१ वी रँक मिळवत प्रतिष्ठेच्या फ्लाईंग ऑफिसर पदासाठी निवड मिळवून जावळी तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला.येत्या जानेवारी २०२६ मध्ये हैदराबाद येथील वायुसेना अकादमीमध्ये त्याचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.