esakal | सातारा जिल्ह्यातील 'या' उपक्रमशील शिक्षकांचे संजय भागवतांनी केले कौतुक; 'सकाळ'च्या पुस्तकात स्थान
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा जिल्ह्यातील 'या' उपक्रमशील शिक्षकांचे संजय भागवतांनी केले कौतुक; 'सकाळ'च्या पुस्तकात स्थान

जिल्ह्यातील शंभर प्राथमिक शिक्षकांच्या यशोगाथा उलगडणाऱ्या "सकाळ'च्या "उपक्रमशील शिक्षक' या पुस्तकाचा ऑनलाइन प्रकाशन कार्यक्रम नुकताच झाला.

सातारा जिल्ह्यातील 'या' उपक्रमशील शिक्षकांचे संजय भागवतांनी केले कौतुक; 'सकाळ'च्या पुस्तकात स्थान

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : ""प्राथमिक शिक्षकांचे अन्‌ समाजाचे जिव्हाळ्याचे नाते असते. शिक्षकांवर समाजाचा विश्वास असतो. शिक्षकाला कुटुंबातीलच एक घटक मानले जाते. आजही असे शिक्षक समाजासाठी भूषण ठरतात. अशा शिक्षकांना समाजापर्यंत पोचविण्याचे काम "सकाळ'ने केले आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी व्यक्त केले.
 
जिल्ह्यातील शंभर प्राथमिक शिक्षकांच्या यशोगाथा उलगडणाऱ्या "सकाळ'च्या "उपक्रमशील शिक्षक' या पुस्तकाचा ऑनलाइन प्रकाशन कार्यक्रम नुकताच झाला. त्यामध्ये ते बोलत होते. याप्रसंगी सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, सकाळ मध्यम समूहाचे "सीईओ' उदय जाधव, संपादक सम्राट फडणीस, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर, "सकाळ'चे सरव्यवस्थापक उमेश पिंगळे, सहयोगी संपादक राजेश सोळसकर, वरिष्ठ व्यवस्थापक राजेश निंबाळकर, लेखक सुनील शेडगे यांची उपस्थिती होती.

भारतीय कंपन्यांत जगासाठी लस करण्याची क्षमता; बिल गेट्स गौरवोद्वार

‘ॲप’निंग : देशी ॲप ‘इलेमेंट्‌स’
 
"जिल्ह्याला शिक्षणाची एक वेगळी परंपरा आहे. वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले जात आहेत. लोकसहभागातून शिक्षणाला वेगळी दिशा देणारे असंख्य शिक्षक जिल्ह्यात कार्यरत आहेत, हे चित्र कौतुकास्पद आहे. "सकाळ'ने नेहमीच अशा बाबी प्राधान्यक्रमाने समाजापर्यंत पोचविल्या आहेत, असेही श्री. भागवत यांनी स्पष्ट केले. 
श्रीराम पवार यांनी प्राथमिक शिक्षक हा शिक्षणातील महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. अभ्यासक्रमाच्या अध्यापनापलीकडे शिक्षकाची भूमिका असते. आनंददायी शिक्षण, मूल्यांचे शिक्षण हा विचार आता परवलीचा बनत आहे. समाजात कर्तव्य भावनेने कार्यरत असणारे शिक्षक दिसतात. "सकाळ'ने नेहमीच अशा सकारात्मक विचारांना समाजापर्यंत पोचविले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Video : पालकांनाे, अशी घ्या आपल्या मुलांची काळजी

उदय जाधव यांनी उपक्रमशील शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले. शिक्षक कठोर मेहनत घेऊन पिढी घडविण्यासाठी धडपडतात. त्यांच्या कामाचा ठसा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अखेरपर्यंत कायम राहत असतो, असेही ते म्हणाले. मानसिंगराव जगदाळे यांनी "सकाळ'च्या या उपक्रमांचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. राजेश क्षीरसागर यांनी "सकाळ'चा शैक्षणिक उपक्रमांना प्रसिद्धी देण्यात नेहमीच पुढाकार असल्याचे स्पष्ट केले. माध्यमिक शिक्षकांविषयीही अशी लेखमाला सुरू व्हावी. लॉकडाउनच्या काळात शिक्षकांनी राबविलेले वेगळे उपक्रम "सकाळ'च्या माध्यमातून समाजापर्यंत पोचावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 एक नंबर! शेतकऱ्याच्या मुलाला आली अमेरिकेतील विद्यापीठाची ऑफर!

प्रभावती कोळेकर यांनी या पुस्तकाला जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या दृष्टीने मोठे मोल आहे. हे पुस्तक शिक्षकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. त्यातून अन्य शिक्षकांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असे सांगितले. लेखक सुनील शेडगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या पुस्तकाच्या रूपाने प्राथमिक शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यास हातभार लागेल. सरकारी शाळांतील शिक्षक उत्कृष्ट सेवा बजावितात. श्रद्धेने, निष्ठेने अन्‌ सेवाभावी वृत्तीने कार्यरत असतात, हा संदेश सर्वदूर पोचेल, असे नमूद केले.

कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सरकारचा हिरवा कंदील

सहयोगी संपादक राजेश सोळसकर यांनी पुस्तकाच्या निर्मितीमागील भूमिका उलगडली. शिक्षकांच्या उपक्रमशीलतेला, नावीन्यपूर्ण प्रयोगांना "सकाळ'ने नेहमीच अग्रस्थान दिले आहे. येत्या काळातही "सकाळ'ची हीच भूमिका कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ व्यवस्थापक राजेश निंबाळकर यांनी आभार मानले. या ऑनलाइन प्रकाशन सोहळ्यात सर्व उपक्रमशील शिक्षक सहभागी झाले होते.

loading image
go to top