Pune-Bengaluru Highway : सांगली पेठ नाका ते साताऱ्यातील वळसे फाटा दरम्यान 14 स्पीडगन कॅमेरे; वेगमर्यादा ओलांडल्यास थेट ई-चलनाची होणार कारवाई

Pune Bengaluru Highway speed gun cameras : पेठ नाका ते वळसे फाटा दरम्यान १४ स्पीडगन कॅमेरे बसविण्यात आले असून ते अद्याप कार्यान्वित झालेले नाहीत. तांत्रिक कामे पूर्ण झाल्यानंतर वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांवर ई-चलनाद्वारे कारवाई होणार आहे.
Pune Bengaluru Highway speed gun cameras

Pune Bengaluru Highway speed gun cameras

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Bengaluru Highway) वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि अतिवेगामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पेठ नाका ते सातारा जिल्ह्यातील वळसे फाटा या सुमारे ७० किलोमीटरच्या पट्ट्यात महामार्गाच्या दोन्ही बाजूंना एकूण १४ स्पीडगन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, हे कॅमेरे अद्याप कार्यान्वित झालेले नसून त्यांची तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीने दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com