esakal | टॅंकरच्या धडकेत पुण्याचा एकजण जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

टॅंकरच्या धडकेत पुण्याचा एकजण जागीच ठार

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : कोल्हापूरकडून भरधाव वेगाने पुण्याकडे निघालेल्या कारची टॅंकरला पाठीमागून जोराची धडक बसल्याची घटना आज पहाटे जखिणवाडी फाटा (ता. कऱ्हाड) येथे घडली. अपघातात कारमधील शकील जमाल शेख (वय ४२ रा.स्कायसिटी, धानोर, पुणे) हे जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

पोलिसांची माहिती अशी की, हरिहर सुथन शिवकुमार ( वय २७ रा. नागापट्टीनम, तामीळनाडू) हा कंटेनर घेऊन पुण्याकडे निघाला होता. आज शनिवारी पहाटे चारच्या सुमारास कंटेनर कऱ्हाड जवळील जखिणवाडी फाट्याजवळ आल्यावर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ह्युंडाई कारने कंटेनरला जोराची धडक दिली.

या धडकेत कारमधील शकिल जमाल शेख हे जागीच ठार झाले. तर कारमधील रेश्मा शकील शेख (वय 41), सफा कागलकर(वय 11), सबा कागलकर (वय 12), मेहर कागलकर, मोहंमद कागलकर( 2) हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलिसात झाली असून पोलीस उपनिरिक्षक बी. एस. कांबळे तपास करत आहेत.

loading image
go to top