Karad News : कराडमधील जनजीवन पूर्वपदावर, व्यवहार सुरळीत सुरू

पुसेसावळी येथील दोन गटात घटनेच्या पार्श्वभूमीवर येथे असणारा तणाव आज पूर्णपणे निवळला. त्यामुळे जनजीवन पूर्ववत झाले असून व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत.
Karad Police Bandobast
Karad Police Bandobastsakal

कराड - पुसेसावळी येथील दोन गटात घटनेच्या पार्श्वभूमीवर येथे असणारा तणाव आज पूर्णपणे निवळला. त्यामुळे जनजीवन पूर्ववत झाले असून व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. प्रशासन व पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दक्षतेसाठी पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

पुसेसावळी येथील दोन गटात झालेल्या धुमस चक्रीच्या पार्श्वभूमीवर येथे शहरात तणावपूर्ण शांतता होती त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान दोन दिवस शाळा ही बंद ठेवण्यात आले होत्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ शहर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, कराड तालुका पोलीस निरीक्षक विजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे व सहकाऱ्यांनी परिसरातील प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवले होते.

अल्पसंख्यांक समाजाची व शांतता समितीची बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी शांततेचे व सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कराड शहरासह तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज तिसऱ्या दिवशी शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाली असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे दरम्यान तैनात करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त आजही कायम ठेवण्यात आला आहे.

सोशल मीडियावर राहणार सायबर सेलचा वॉच

इंटरनेट सुरु झाल्यावर सोशल मीडियावर कोणताही अक्षयपार्य मेसेज किंवा पोस्ट व्हायरल करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान असा कोणताही मेसेज किंवा पोस्ट व्हायरल झाल्यास त्यावर पोलीससांच्या सायबर सेलकडून बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.

त्यासाठीची कार्यवाही सायबर सेलकडून सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये कोणी सापडला तर त्याच्यावर थेट कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com