
महाबळेश्वर: येथील वेण्णा लेक परिसरात असणाऱ्या काळे वस्तीजवळच्या झुडपांमध्ये सुमारे सात ते आठ फूट लांबीचा अजगर आढळला. त्याला महाबळेश्वर वन विभाग व सह्याद्री प्रोटेक्टर्समार्फत रेस्क्यू करण्यात आले. त्यानंतर त्याला मानवी वस्तीपासून दूर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.