लसीकरणाला वशिलेबाजीचे गालबोट; मेव्हण्या-पाहुण्याचे नाव सांगून जबरदस्ती घेतली जातेय 'लस'

लसीकरणाची माहिती मिळाल्यावर नागरिक, महिला, ज्येष्ठ लोक लसीकरणासाठी पहाटेपासूनच रांगेत उभे राहताहेत.
Covid Vaccination
Covid Vaccination esakal

कऱ्हाड (सातारा) : पहाटे उठायचे... लसीकरणासाठी (Covid Vaccination) रांगेत उभे राहायचे... सकाळी आरोग्य कर्मचारी आले की नावनोंदणीसाठी वाट पाहात बसायचे... अशात हा आमक्‍याचा पाहुणा, तो तमक्‍याचा मेव्हणा अशांना वशिल्याने लसीकरणासाठी समोरून नेले जात असल्याचे पाहायचे... थोड्या वेळाने आरोग्य (Health Department) कर्मचाऱ्यांनी लस संपली असे सांगितले, की मुकाट्याने घरी जायचे... ही तऱ्हा आहे जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक (Coronavirus) लसीकरणाची. त्यासंदर्भात खुद्द लोकप्रतिनिधींच भांडफोड करूनही आरोग्य विभागाची पहिले पाढे पंच्चावन्न अशीच स्थिती झाली आहे. त्याचा आता प्रशासनानेच विचार करून लसीकरणाला शिस्त लावण्याची गरज आहे. (Queue Of Citizens Outside The Center For Covid Vaccination At Karad Satara News)

कऱ्हाड तालुक्‍यात 11 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 84 आरोग्य उपकेंद्रामार्फत, तर शहरात वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, नागरिक आरोग्य केंद्र व अन्य दोन ठिकाणी लसीकरण सुरू आहे. त्यामार्फत लसीकरणाचा सव्वा लाखाचा टप्पा ओलांडला आहे. अजूनही 45 वर्षांवरील एक लाखावर नागरिकांना लसीकरण व्हायचे आहे. लस आलेलीही लोकांना कळवले जात नाही. त्यातच मागणीप्रमाणे आवश्‍यक त्या प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. ज्या गावात लसीकरण आहे, त्या गावातील लोकांनाच पुरेसी लस उपलब्ध होत नाही. त्यामुळेही मोठी गैरसोय होत आहे.

लसीकरणाची माहिती मिळाल्यावर नागरिक, महिला, ज्येष्ठ लोक लसीकरणासाठी पहाटेपासूनच उभे राहतात. नाव नोंदवून त्यांना कूपन देण्यात येतात. मात्र, काही ठिकाणी लसीकरणासाठी पहाटेपासून उभे राहिलेले तसेच उभे असतात आणि वशिलेवाल्यांना दूरवर गाड्या थांबवून तेथे लसीकणासाठी आणले जाते. थेट लसीकरण करून त्यांना परत पाठवले जाते. हा प्रकार खुद्द लोकप्रतिनिधींनीच उजेडात आणला आहे. त्यावर आरोग्य विभाग अजूनही काहीच कार्यवाही करू शकलेला नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घालून कार्यवाही करण्याची गरज आहे.

आदल्या दिवशीच होतेय नावनोंदणी

काही ठिकाणी आपल्या मर्जीतील लोकांनाच लसीकरण व्हावे, यासाठी काही पुढाऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना आदल्या दिवशीच संबंधितांची नावनोंदणी करून त्यांचे कूपन बाजूला काढण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे रांगेतील लोक रांगेतच आणि वशिल्याचे लस घेण्यासाठी पुढे, अशी स्थिती झाली आहे. त्याचाही विचार आता आरोग्य विभागाने करणे गरजेचे बनले आहे.

गोडोलीत बाधितांसाठी मोफत औषधोपचारासह Oxygen Bed; पंचायतीचा पुढाकार

Queue Of Citizens Outside The Center For Covid Vaccination At Karad Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com