Bhanudas Mali : ओबीसींचा आवाज राहुल गांधींनी संसदेत उठवला' - भानुदास माळी

भानुदास माळी, समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी
rahul gandhi raised voice of OBC in Parliament Bhanudas Mali demand for caste-wise census
rahul gandhi raised voice of OBC in Parliament Bhanudas Mali demand for caste-wise censussakal

कऱ्हाड : ओबीसी समाजाला न्याय द्यायचा असेल तर ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून त्यांच्या आकडेवारीनुसार सर्वच क्षेत्रामध्ये समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे, अशी मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केली.

गांधींनी ओबीसींचा आवाज संसदेत उठवल्याबद्दल समाजाच्यावतीने आम्ही त्यांचे अभिनंदन करत आहोत, अशी माहिती कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिली.

श्री. माळी म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार माझ्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पनवेल, पुणे, नाशिक, बीड, चंद्रपूर, कऱ्हाड, सांगली आदी ठिकाणी ओबीसींचे मेळावे आयोजीत करून ओबीसींच्या विविध मागण्यांवर तसेच जातनिहाय जनगणनेवर केंद्र तसेच राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.

परंतु त्याची दखल या सरकारने घेतली नव्हती. भारत जोडो यात्रेदरम्यान श्री. पटोले व मी ही बाब राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यास प्रतिसाद देत श्री. गांधी यांनी ओबीसींच्या विविध अडचणीवर अभ्यास करून संसदेच्या विशेष अधिवेशनात ओबीसींच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली.

ओबीसी समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करून ओबीसी समाजाला त्यांच्या आकडेवारीनुसार सर्वच क्षेत्रामध्ये समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे अशी मागणी त्यांनी संसदेत केली.

rahul gandhi raised voice of OBC in Parliament Bhanudas Mali demand for caste-wise census
Satara: "दंगलीतील दोषींवर कडक कारवाई करू" अजित पवारांनी घेतली शिकलगार कुटुंबाची भेट

त्यांनी ओबीसींवरील अन्यायाला वाचा फोडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाकडून राहुल गांधी यांचे आम्ही अभिनंदन करत आहोत. येणाऱ्या काळात काँग्रेस हा एकमेव पक्ष ओबीसींच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहू शकतो असा विश्वास ओबीसी प्रवर्गामध्ये निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com