

Karad Warehouse Raid Sparks Panic Among Ration Shop Owners After 11-Tonne Seizure
sakal
कऱ्हाड : येथील पुरवठा विभागाने एका खासगी गोदामावर छापा टाकून तेथे लपवलेल्या गहू, तांदळाची सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे ११ टन धान्य जप्त केले. येथील वाखाण परिसरात सकाळी नऊपासून ही कारवाई सुरू होती. या धान्यात सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदारांना वाटपाचे धान्य आहे का? याची चौकशी सुरू असल्याचे पुरवठा निरीक्षक साहिला नायकवडे यांनी स्पष्ट केले.