
मसूर : कोयना एक्स्प्रेसमध्ये विकलांग डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र हिसकावून अल्पवयीन चोरट्यांनी रेल्वेतून उडी मारून पलायन केले होते. ही घटना शनिवारी (ता. नऊ) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तारगाव रेल्वे स्थानकावर घडली. मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या पथकाने सातारा रेल्वे पोलिसांच्या मदतीने अवघ्या २४ तासांत या घटनेतील दोघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे तीन लाख ८५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.