अवकाळी पाऊस धडकला; गहू, ज्वारीसह आंब्याचा माेहराचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

आज (गुरुवार) पहाटेपासुन माण तालुक्यात सर्वत्रच ढगाळ हवामान झाले हाेते.

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे गहू, ज्वारीसह आंब्याचा माेहराचे नुकसान झाले आहे. या पावसाचा परिणाम दुष्काळी तालुक्यात देखील पाहवयास मिळत आहे. 

बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे डिस्कळ, बुध परिसरातील गहू, ज्वारीची पिके ठिक ठिकाणी भुईसपाट झाली आहेत. दरम्यान आज (गुरुवार) पहाटेपासुन माण तालुक्यात सर्वत्रच ढगाळ हवामान झाले हाेते. ठिकठिकाणी अवकाळी रिमझिम पाऊस पडू लागल्यामुळे शेतकरी बाधंवाची धांदल सुरु झाली आहे.
 
विशेषत: म्हसवड भागातील शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील काढणी केलेले कांदे माळरानात वाळण्यासाठी पसरले असून ते पावसाने भिजू नये म्हणून त्यावर प्लॅस्टीक कागद झाकून सुरक्षित ठेवण्यात गुंतले आहेत. काढणीस आलेल्या गव्हाच्या व ज्वारीच्या उभ्या पिकांचे या अवकाळी पावसाने नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

मातीची भाजीव विट उत्पादन करणा-यांचीही या अवकाळी पावसामुळे नुकसान होऊ लागले आहे. भट्टीत भाजण्यापुर्वी ऊन्हात सुकविण्यासाठी ठेवलेल्या विटां या अवकाळी पावसाने भिजल्यामुळे नुकसान होणार असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

सद्यःस्थितीत, मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण होत असल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसामुळे वाया जातील या भीतीमुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. काही ठिकाणी हरभरा, ज्वारीची पिके काढून ठेवली आहेत. ती या अवकाळीत सापडू नयेत यासाठी मळून धान्य घरी आणण्याची शेतकऱ्यांची गडबड सुरू झाली आहे. परिणामी वेगवेगळ्या संकटातून सावरताना शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तुम्हांला कमळ फुललेले दिसेल; भाजप नेत्याचा दावा 

पाच महिन्यांत दुप्पट पैसे करुन देताे म्हणणा-याचे काय झाले, वाचा सविस्तर

शरद पवारांशी चर्चेनंतरच व्यवस्थापनाने आम्हांस प्रतापगड साेपविलाचा संचालक मंडळास पडला विसर!

आता अधिकारी, कर्मचाऱ्यांची उदयनराजे करणार ओपन हार्ट सर्जरी?

राजधानीत शिवजयंतीची उत्सुकता शिगेला; पुतळे, भगव्या झेंड्यांनी सजला सातारा!

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Hits Rabbi Crops In Drought Area Satara Marathi News