राजधानीत शिवजयंतीची उत्सुकता शिगेला; पुतळे, भगव्या झेंड्यांनी सजला सातारा!

दिलीपकुमार चिंचकर
Thursday, 18 February 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शिवजयंती कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

सातारा : समस्त युवकांसह सर्वांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या शिवजयंतीसाठी युवकांत मोठा उत्साह आहे. विक्रेत्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांसह भगवे झेंडे, भगवे रूमाल, छत्रपतींची प्रतिमा असलेल्या टोप्या, डोक्‍याला बांधायच्या रिबन असे सारे काही उपलब्ध केले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शिवजयंती कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. 

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने शिवजयंती साधेपणानेच साजरी करण्याच्या सूचना केल्या आहेत. तरीही गावोगावी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शासनाची बंधने पाळून साजरी करण्याचा मनोदय युवा मंडळांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने यावर्षी सर्व सण-उत्सवांवर काहीशी बंधने घातली आहेत. तरीही सोशल डिस्टन्सिंग पाळून धार्मिक विधी करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे.

हे पण वाचा- Success Story : कर हर मैदान फ़तेह! हिना इनामदारची भारतीय सैन्य दलात जिगरबाज भरारी

शिवजयंती हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, जयंती साजरी करण्यावर शासनाने बंधने घातली आहेत. मिरवणुकांवर तर बंधने आहेतच. तरीही सध्या तरी कार्यकर्त्यांत आणि युवकांत शिवजयंतीबाबत मोठी उत्सुकता आहे. शहरात सातारा-कोरेगाव महामार्गावर बॉंबे रेस्टॉरंट चौक, राजवाडा परिसर अशा विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे, प्रतिमा विक्रीसाठी मांडल्या आहेत. अगदी टपऱ्यांवरही भगवे लहान-मोठे झेंडे विक्रीसाठी मांडलेले आहेत. त्याच्या किमती दहा रुपयांपासून 150 ते 200 रुपयांपर्यंत आहेत. त्यास युवा ग्राहकही चांगला आहे. 

हेही वाचा- आता रामराज्य! इथं काेणच डाॅन नाही, तडीपारांना कसा धडा शिकवायचा मला चांगलं माहितीये

सध्या "कोरोना' पुन्हा डोके वर काढू लागलेला आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शिवजयंती कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले. सामूहिक कार्यक्रम, मिरवणुकांचे आयोजन न करता शिवछत्रपतींच्या पुतळ्याला हार अर्पण करावेत. मात्र, त्यावेळी दहापेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत. जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Saffron Flags For Sale On The Occasion Of Shiva Jayanti In The Market At Satara