Rain Update : कोयना धरण क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कमी; महाबळेश्वरला सर्वात कमी पावसाची नोंद

पश्चिम भागात थोड्या प्रमाणात पाऊस पडत असला, तरी पूर्वेकडे मात्र गेली तीन दिवस पावसाने पूर्ण उघडीप घेतली आहे.
Koyna Dam
Koyna Damesakal
Updated on
Summary

जलाशयात प्रतिसेकंद चार हजार दहा क्युसेक पाण्याची आवक होत असून, एकूण पाणीसाठा २३.६९ टीएमसी झाला आहे.

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा (Rain Update) जोर कमी झाला आहे. पश्चिम भागात थोड्या प्रमाणात पाऊस पडत असला, तरी पूर्वेकडे मात्र गेली तीन दिवस पावसाने पूर्ण उघडीप घेतली आहे.

Koyna Dam
Vaibhav Naik : ..म्हणून शिंदे गटाचे 'ते' 16 आमदार अपात्र होणार; सुप्रीम कोर्टाचा दाखला देत नाईकांचं स्पष्टीकरण

दिवसभरात एक किंवा दुसरी रिमझिम पावसाची सर येते एवढाच शेतकरी वर्गाला दिलासा मिळतोय. गेल्या २४ तासांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ३२ मिलिमीटर, नवजाला ३५ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला (Mahabaleshwar) सर्वात कमी १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Koyna Dam
पूजेसाठी वापरला जाणारा 'कापूर' कशापासून तयार केला जातो? काय आहेत फायदे, झाड का होतंय दुर्मिळ; जाणून घ्या..

जलाशयात प्रतिसेकंद चार हजार दहा क्युसेक पाण्याची आवक होत असून, एकूण पाणीसाठा २३.६९ टीएमसी झाला आहे. दरम्यान, पावसाने पूर्णपणे उघडीप घेतल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam latest water storage update
Koyna Dam water level today
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyna Dam latest water storage update
Marathi News Esakal
www.esakal.com