Satara News : कर्जमाफीसाठी विधानसभेत आवाज उठवणार; सरकारमधील मंत्र्यांसमोरच पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना राबवली. सरकारचा हा स्त्युत्य उपक्रम होता.
raise voice in assembly agri loan waiver Prithviraj Chavan marathi news satara
raise voice in assembly agri loan waiver Prithviraj Chavan marathi news sataraSakal

Satara News : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना राबवली. सरकारचा हा स्त्युत्य उपक्रम होता. मात्र काही कारणांमुळे आमचे सरकार बदलले. त्यानंतर अजुनही या कर्जमाफीपासुन सहा लाख शेतकरी वंचीत आहेत. त्याचबरोबर ५० हजार रुपये प्रोहोत्सानपर अनुदानही अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.

त्यासंदर्भात शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या विधानसभा अधिवेशनात त्यावर आवाज उठवणार आहे, असे स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील,

आमदार चव्हाण व मान्यवर आले होते. त्यादरम्यान बोलताना आमदार चव्हाण म्हणाले, हवामान बदलामुळे दोन वर्षापुर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यंदा पाऊस नसल्याने टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या छावण्या सुरु केल्या पाहिजे.

शासन निर्णय घेईल त्यावेळी तातडीने छावण्या सुरु झाल्या पाहिजेत अशी व्यवस्था करावी. वनतलावांचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. त्यातुन शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल.

मात्र वन विभाग, पाटबंधारे विभाग, जलसंधारण खाते, पाणी पुरवठा खाते यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही योजना रखडली आहे. त्यासाठी विशेष धोरण राबवुन सर्व अधिकाऱ्यांचा समन्वय साधुन वनतलावांचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. ऊसाचा उत्पादन घटल्याने कारखाने १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस चालतील असे दिसत नाही.

उत्पादन वाढण्यासाठी कृषी प्रदर्शनाचा चांगला उपयोग होईल. सारथीच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे. रोजगार निर्मीती करण्यामध्ये शासनाकडुन प्रयत्न न झाल्याने तरुण आंदोलनाचा पर्याय स्विकारत आहेत. आंदोलनाच्या माध्यमातुन प्रश्न न सोडवता शासनाने धोरणात्मक निर्णय घेवुन असे प्रश्न सोडवले पाहिजेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com