Rajendra Yadav: विदूषकांच्या हाती सत्ता दिल्यास सर्कस: राजेंद्र यादवांचा हल्लाबोल; कऱ्हाडात यशवंत विकास आघाडी, शिवसेनेचा मेळावा

Yashwant Vikas Aghadi: पालिकेत नगरसेवक म्हणून १९९९ मध्ये निवडून आलो. राजकारण पिंड नव्हता व नाही. मात्र, अपघाताने आलो, यावे लागले. माझे एनडीएत जायचे ध्येय होते. मात्र, वडिलांच्या अकस्मित निधनानंतर उभे राहावे लागले. त्यावेळी सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून निवडून आलो.
Rajendra Yadav addressing the Shiv Sena–Yashwant Vikas Aghadi rally in Karad.

Rajendra Yadav addressing the Shiv Sena–Yashwant Vikas Aghadi rally in Karad.

Sakal

Updated on

कऱ्हाड : शहराची सत्ता विदूषकाच्या हाती देऊ नका, कारण तो विकास नाही तर शहराची सर्कस करणार, असा टोला यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, शिवसेनेचे समन्वयक राजेंद्र यादव यांनी लगावला. शिवसेनेतर्फे श्री. यादव यांची नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषणाही यावेळी संपर्क प्रमुख शरद कणसे यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com