
Raju Shetti addressing the Swabhimani Shetkari Sanghatana meeting in Satara, warning the government over unfulfilled loan waiver commitments.
Sakal
सातारा : मे महिन्यापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पाटण, जावळी, वाई, सातारा, कोरेगाव, कऱ्हाड तालुक्यांमध्ये मशागत आणि पेरणीचे नियोजन कोलमडले. माण, खटाव, फलटण भागांत परतीच्या पावसाने हाहाकार माजविला. दुबार पेरणी, खत वापरातील अडचणी आणि उत्पादन घट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने दिलेला कर्जमुक्तीचा शब्द पाळला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.